Save water
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणाऱ्या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.
असे वाचवा पाणी
आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण पाणी पितो. सर्वसाधारणपणे पिण्यासाठी पेलाभर पाणी घेतो. मात्र, खूपदा एखाद दुसरा घोट पाणी पिऊन उरलेले पाणी आपण फेकून देतो. हे दृश्य घरी, समारंभात बऱ्याचदा पाहायला मिळते. हे फेकून दिलेले पाणी आपण मोजले, तर आपण पाण्याचा किती मोठ्या प्रमाणात अपव्यय करतो हे कळेल. असा प्रयोग आपण आपल्या घरीही सहज करू शकता. दिवसभरात किती पाणी वाया जाते ते बघा.
बऱ्याचदा कुठेतरी जवळपास नळ सुरू असल्याचा आवाज ऐकू येतो. पाण्याचा आवाज ऐका. कुठे पाणी वाहते आहे याचा शोध घेऊन नळ बंद करा.
Collecting good information.
ReplyDeleteNice one